Anuradha Vipat
मधुमेह असलेल्या लोकांसाठी सर्वात योग्य तांदूळ म्हणजे ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असलेले बासमती , ब्राउन राइस, लाल तांदूळ आणि काळा तांदूळ होय.
कमी GI असलेला भात रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवतो ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
हा मधुमेह रुग्णांसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. ब्राऊन राईसवर प्रक्रिया कमी केलेली असते, त्यामुळे त्यातील फायबर आणि पोषक तत्वे टिकून राहतात.
या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो. त्यामुळे तो रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवत नाही
काळ्या तांदळामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
यावर प्रक्रिया जास्त केलेली असल्याने त्यातील पोषक तत्वे आणि फायबर निघून जाते.
भात कोणताही असो, मधुमेह रुग्णांनी तो मर्यादित प्रमाणातच खावा.