Animal Rebis Disease : अशी ओळखा जनावरांमधील रेबीज आजाराची लक्षणे

Team Agrowon

गायी, म्हशी, बैल, शेळी व मेंढ्यांमध्ये रेबीज आजार हा पिसाळलेल्या श्वानाच्या चाव्यामुळे होतो. काहीवेळा पिसाळलेला कोल्हा, लांडगा जंगल सीमा ओलांडून जनावरांना चावा घेतात.

Animal Rebis Disease | Agrowon

रेबीज हा आजार, रेबीज विषाणूग्रस्त श्वान, मांजर, माकड, लांडगा, कोल्हा, वटवाघूळ, मुंगूस व इतर कुठल्याही प्राण्यांनी चावा घेतल्यास, त्याच्या लाळेमध्ये असलेले विषाणू जखमेतून मानव तसेच जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात.

Animal Rebis Disease | Agrowon

रुग्णांनी लक्षणे दाखवण्यासाठी लागणारा वेळ, चावा घेतलेली जागा, मेंदूपासून किती अंतरावर आहे यावर अवलंबून असते.

Animal Rebis Disease | Agrowon

साधारणपणे मोठ्या गायी, म्हशी, बैलांमध्ये मानेच्या वरच्या भागास पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्यास लक्षणे विसाव्या दिवशी चालू होतात.

Animal Rebis Disease | Agrowon

जनावरे २ ते ३ दिवसांत दगावतात. वासरांमध्ये लक्षणे पंधराव्या दिवशी सुरू होतात. ही लक्षणे ०,३,७,१४ व २८ व्या दिवशी देण्यात येणाऱ्या लसीकरणानंतर सुद्धा दिसून येतात.

Animal Rebis Disease | Agrowon

जनावरांमध्ये मानेच्या वरच्या भागास पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्यास फक्त लसीकरण प्रभावी ठरत नाही.

Animal Rebis Disease | Agrowon

ज्या भागात रेबीजचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी जनावरांच्यामध्ये अनेकदा अधिवस्था (स्पिलओव्हर) संसर्ग होतो.

Animal Rebis Disease | Agrowon
आणखी पाहा...