Mahesh Gaikwad
कृषी प्रधान भारत देशात शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे शेतकऱ्यांचा ओढा अधिक असतो.
शेतीसोबतच आता पशुपालनातही विविधता पाहायला मिळत आहे. गायी-म्हशीं पालनानंतर शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती ही शेळीपालनाला असते.
मांस उत्पादनासाठी शेळीपालनाकडे शेतकऱ्यांचा ओढा पाहायला मिळतो. परंतु शेळीचे दूध हे अनेक गंभीर आजारांवर गुणकारी मानले जाते.
दुधातील औषधी गुणधर्मांमुळे अलिकडच्या काळात शेळीच्या दुधाच्या मागणीही वाढत आहे. शेळ्यांच्या काही जाती अशा आहेत, ज्या जास्त दूध उत्पादनासाठी प्रसिध्द आहेत.
जमुनापारी दी देशातील सर्वात उंच शेळीची जात असून दूध आणि मांस उत्पादनासाठी ही शेळी पाळतात. एका वेतात ही शेळी २०१ लिटरपर्यंत दूध देते.
संगमनेरी शेळी मांस आणि दूध उत्पादनासाठी पाळली जातात. या शेळीला महाराष्ट्रातील दुधाची राणी असही म्हणतात. एका वेतात ही शेळी ८० लिटरपर्यंत दूध देते.
सानेन ही शेळी ही इतर शेळ्यांच्या तुलनेत जास्त दूध देणासाठी ओळखली जाते. एका वेतात २०१ लिटरपर्यंत दूध देते.