Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रात धन साठत नाही किंवा आलेले पैसे लगेच खर्च होतात, याची काही प्रमुख कारणे सांगितली आहेत.
घराचा उंबरठा तुटलेला असेल किंवा मुख्य दरवाजासमोर कचरा असेल, तर लक्ष्मी टिकत नाही.
संध्याकाळी उंबरठ्यावर दिवा न लावणे हे देखील धन हानी होण्याचे कारण असू शकते.
घराची ईशान्य दिशा अस्वच्छ असल्यास आर्थिक प्रगती खुंटते. या दिशेला शौचालय किंवा कचरा असल्यास धन हानी होते.
कधीही पैसे मोजताना थुंकी लावणे, पैसे अस्ताव्यस्त ठेवणे किंवा पाकिटात फाटलेल्या नोटा व जुनी बिले साठवून ठेवणे.
उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेला तिजोरी असावी आणि तिचे तोंड उत्तरेकडेच उघडले पाहिजे.
घरात नळ गळत असणे हे 'धन गळतीचे' प्रतीक मानले जाते.