Anuradha Vipat
हिंदू संस्कृती आणि परंपरेमध्ये तिन्ही सांजेला म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी घराच्या उंबरठ्यावर किंवा बाहेर दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे.
तिन्ही सांजेला दिवा लावण्यामागील शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणे खालीलप्रमाणे आहेत.
संध्याकाळची वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. दिवा हा मांगल्याचे प्रतीक मानला जातो.
दिव्याचा प्रकाश नकारात्मकतेला घराबाहेर रोखतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो.
संध्याकाळी देवापाशी किंवा घराबाहेर दिवा लावल्याने मनावरचा दिवसभराचा ताण कमी होतो आणि घरात एक प्रकारचे चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते.
आपल्याकडे संध्याकाळी दिवा लावून 'शुभं करोति कल्याणम्' हा श्लोक म्हणण्याची पद्धत आहे.
तिन्ही सांजेला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावणे उत्तम मानले जाते.