Anuradha Vipat
तोंडांत टाकताच विरघळणारे मऊसूद रवा लाडू बनवण्यासाठी आम्ही दिलेली साधी सोपी रेसिपी नक्कीचं तुमच्या कामी येईल.
जाड रवा - २ कप, साजूक तूप - १ कप, पिठीसाखर - १.५ कप , नारळाचा किस - १/२ कप ,दूध - १/४ कप , वेलची पूड - १ चमचा, काजू, बदाम - २ चमचे , मनुका - १ चमचा .
अर्धा कप तूप गरम करुन त्यात जाड रवा मंद आचेवर सोनेरी रंग आणि खमंग वास येईपर्यंत भाजा.
तूप गरम करून त्यात काजू, बदाम आणि मनुका सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. रवा मिक्सरमधून बारीक करून घ्या.
बारीक केलेला रवा, तळलेले ड्रायफ्रूट्स, नारळाचा किस आणि वेलची पूड एकत्र करा.मिश्रणात पिठीसाखर मिसळा.
गरम दूध थोडे घालून मिश्रण चांगले मळून घ्या आणि लाडू वळायला सुरुवात करा.
लाडू थोडे थंड झाल्यावर ते हवाबंद डब्यात भरून ठेवा.