Anuradha Vipat
दिवाळीतील फराळासाठी खुसखुशीत आणि स्वादिष्ट नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी आम्ही दिलेली नारळ करंजीची सोपी रेसिपी नक्की फॉलो करा.
नारळ करंजी बनवण्यासाठी करंजीचे सारण तुम्ही ओल्या नारळाचे किंवा सुक्या खोबऱ्याचे बनवू शकता.
मैदा - २ कप, बारीक रवा - १/४ कप, तूप - १/४ कप, मीठ , पाणी , तेल.
किसलेले ओले खोबरे - २ कप, गूळ - १ क, खसखस , वेलची पूड , काजू, बदाम.
मैदा, रवा आणि मीठ एकत्र करा. तूप गरम करून मैद्यात घाला आणि हाताने मिक्स करा.थोडे पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्या.
कढईत किसलेले ओले खोबरे आणि गूळ एकत्र करा. सारण घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर परता.
खसखस आणि वेलची पूड घालून मिक्स करा.कणकेचे गोळे करुन पोळी लाटून घ्या आणि त्यात सारण भरा. करंजी मंद आचेवर तळा करंजी तयार आहे