Anuradha Vipat
दिवाळीत फराळाला विशेष महत्व आहे. आज आपण चविला स्वादिष्ट असे रव्याचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी पाहूयात.
बारीक रवा, साखर , तूप, वेलची पूड, ड्रायफ्रूट्स, नारळाचा किस.
गरम तूपात रवा घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्या.
दुसऱ्या कढईत तूप घालून काजू आणि बेदाणे सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेला रव्यात साखर, वेलची पूड आणि भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि नारळाचा किस घालून चांगले मिसळा.
तयार मिश्रणात थोडे-थोडे तूप घालून लाडू वळा. लाडू वळल्यानंतर ते पूर्णपणे सेट होईपर्यंत ठेवा.
लाडू मऊ होण्यासाठी रवा मंद आचेवर भाजणे महत्त्वाचे आहे.
साखर आणि तूप तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.