Anuradha Vipat
माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी प्रामुख्याने दूध आणि तांदळाची खीर किंवा गोड भात नैवेद्य म्हणून तयार केला जातो.
घराच्या अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या पात्रात दूध उकळायला ठेवले जाते.
दूध उकळून पात्राबाहेर सांडणे म्हणजेचं उतू घालवणे हे शुभ मानले जाते. हे दूध सूर्याला अर्पण केले जाते असे समजले जाते .
या आटवलेल्या दुधात नवीन तांदूळ, गूळ किंवा साखर आणि सुका मेवा घालून खीर तयार केली जाते.
हा नैवेद्य सूर्यदेवाला समर्पित करून मग घरातील सर्व सदस्य तो प्रसाद म्हणून ग्रहण करतात.
हिंदू पंचांगानुसार माघ शुद्ध सप्तमीला सूर्यदेवाचा जन्म झाला असे मानले जाते
सप्तमी या दिवसाला 'अर्क सप्तमी' किंवा 'माघ सप्तमी' असेही म्हणतात