Anuradha Vipat
मटन चायला जड आणि प्रथिनयुक्त असते. त्यामुळे मटन खाल्ल्यानंतर शरीराला ते पचवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते.
मटन खाल्ल्यानंतर खालील चुका करणे टाळावे अन्यथा आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.
मटन खाल्ल्यानंतर लगेच झोपल्याने पचनक्रिया मंदावते. यामुळे अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते.
मटन खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिऊ नका.
मटन आणि दूध हे 'विरुद्ध अन्न' मानले जाते. मटन खाल्ल्यानंतर लगेच दूध, दही किंवा दुधाचे पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
जेवणानंतर लगेच मोठ्या प्रमाणात पाणी पिणे टाळा. यामुळे पाचक रसे पातळ होतात आणि मटन पचायला जास्त वेळ लागतो.
मटन खाल्ल्यानंतर आईस्क्रीम किंवा कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळावे. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि पोटात दुखू शकते