Mahesh Gaikwad
भारताची खाद्य संस्कृती जगभरात प्रसिध्द आहे. भारतातील खाद्य संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता पाहायला मिळते.
भारतातील अनेक शाकाहारी आणि मांसाहारी पध्दतीचे जेवणाची भूरळ परदेशातील लोकांनाही पडते.
रसमलई ही देखील भारतातील सुप्रसिध्द अशी मिठाई आहे. बंगाली मिठाईच्या प्रकारातील ही रसमलई ही मिठाई आहे.
प्राचीन काळापासून भारतात रसमलई ही भारतातील लोकांची आवडती मिठाई आहे. भारताच्या याच रसमलईला जागतिक पातळीवर विशेष ओळख मिळाली आहे.
जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम चीज डेझर्ट म्हणून भारताच्या रसमलई घोषित करण्यात आली आहे. दूध आणि चीजपासून तयार केलेल्या पदार्थांना चीज डेझर्ट म्हणतात.
फूड रिव्ह्यू देणाऱ्या टेस्ट अॅटलास संस्थेने दिलेल्या गुणांकनात रसमलई जगातील दुसऱ्या क्रमांकाची मिठाई ठरली आहे.
दूध, साखर, मेवा, केसर आणि इलायची या प्रमुख घटकपदार्थांपासून रसमलई तयार केली जाते. हीच सरमलई आता विदेशातही आपली ओळख निर्माण करत आहे.