Anuradha Vipat
रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला आधुनिकतेसोबतच आपल्या मराठमोळ्या परंपरेचा साज लेपणे हा एक वेगळाच आनंद देतो.
यंदाच्या राखी पौर्णिमेला जर तुम्हाला गर्दीत उठून दिसायचे असेल, तर आधुनिकता आणि परंपरेचा सुरेख संगम असलेला अस्सल मराठी लुक नक्की ट्राय करा.
काठपदराची किंवा मयूरपंखी डिझाईन असलेली सिल्क पैठणी साडी नेसा. लाल, हिरवा, जांभळा किंवा रॉयल ब्लू रंगाची पैठणी रक्षाबंधनासाठी खूप खुलून दिसते.
आजकाल खणाची साडी आणि खणाचे रेडीमेड कुर्ते-स्कर्ट्स प्रचंड फॅशनमध्ये आहेत. या साड्या वजनाने हलक्या असतात आणि लुकही एकदम क्लासी येतो.
जर तुम्हाला साडी नेसणे जड वाटत असेल, तर पैठणी बॉर्डर असलेला अनारकली ड्रेस किंवा खणाच्या कापडाचा लॉंग गाऊन परिधान करू शकता.
गळ्यात बारीक मोत्यांची किंवा सोन्याची ठुशी घाला. जर गळा रिकामा वाटत असेल, तर त्यासोबत एक लांब कोल्हापुरी साज किंवा पुतळी हार घालू शकता.
नाकात पेशवाई किंवा कारवारी नथ घातल्याशिवाय मराठी लुक पूर्ण होत नाही.