Rakhi Thali Decoration : अशी सजवा आरोग्याची आणि समृद्धीची 'रक्षाबंधन विशेष' पूजा थाळी!

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाचे

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला ओवाळण्यासाठी पूजेची थाळी पद्धतशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीने सजवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

Rakhi Thali Decoration | agrowon

सोपी पद्धत

थाळीमध्ये प्रत्येक साहित्याला धार्मिक महत्त्व असून, पूजेची तयारी करताना कोणतीही वस्तू सुटू नये म्हणून साहित्याची संपूर्ण लिस्ट आणि थाळी सजवण्याची सोपी पद्धत खाली दिली आहे.

Rakhi Thali Decoration | agrowon

प्रार्थना

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावाच्या उजव्या मनगटावर रक्षासूत्र बांधून त्याच्या यशासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

Rakhi Thali Decoration | agrowon

साहित्य

तांबे, चांदी किंवा पितळाचे स्वच्छ ताट,राखी ,कुंकू किंवा हळद-कुंकू,अक्षता ,दिवा ,सोने किंवा चांदीचे नाणे/अंगठी,मिठाई,नारळ ,पाण्याचा तांब्या किंवा चमचा.

Rakhi Thali Decoration | agrowon

दिवा , कुंकू आणि अक्षता

पूजेच्या थाळीच्या अगदी मध्यभागी किंवा उजव्या बाजूला तेवत असलेला दिवा ठेवा. डाव्या बाजूला लहान वाट्यांमध्ये कुंकू आणि अक्षता ठेवा.

Rakhi Thali Decoration | agrowon

राखी आणि मिठाई

थाळीच्या पुढील भागात राखी व्यवस्थित ठेवा. आरती झाल्यानंतर लगेच तोंड गोड करण्यासाठी उजवीकडे मिठाईची वाटी ठेवा.

Rakhi Thali Decoration | Agrowon

फुलांची सजावट

थाळीची शोभा वाढवण्यासाठी कडेने झेंडूची किंवा गुलाबाची फुले आणि पानावरील अक्षता ठेवा.

Rakhi Thali Decoration | agrowon

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी 'हा' आहे सर्वात मोठा शुभ मुहूर्त

Raksha Bandhan 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...