Bedana Market : येत्या काळात बेदाणा दरात होणार वाढ

Team Agrowon

दिवाळीच्या सुट्टीनंतर बाजारपेठेत बेदाण्याची आवक हळू हळू वाढू लागली आहे. उठावही वाढू लागला आहे.

Bedana Market | Agrowon

दर्जेदार बेदाण्याला प्रति किलोस १२० ते २०० रुपये असा दर मिळत आहे. बेदाण्याचे दर टिकून आहेत.

Bedana Market | Agrowon

येत्या काळात बेदाण्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Bedana Market | Agrowon

सांगली जिल्ह्यातील तासगाव, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या तिन्ही बाजार समितीत दिवाळीसुट्टीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले आहेत.

Bedana Market | Agrowon

या तीनही बाजारात ५ ते ६ हजार टन बेदाण्याची आवक होत आहे. त्यापैकी ५० ते ६० टक्के बेदाण्याची विक्री होत आहे. दिवाळीपूर्वी दर्जेदार बेदाण्याला प्रति किलोस १२० ते २०० रुपये असा दर होता.

Bedana Market | Agrowon

सुट्टीनंतर सौदे सुरू झाले त्यावेळी बेदाण्याची आवक थोडी मंदावली होती. परंतु त्यानंतर बेदाण्याची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून दर्जेदार बेदाण्याला चांगला दर मिळत आहे.

Bedana Market | Agrowon

यंदाचा बेदाणा निर्मितीचा हंगाम जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरवात होण्याची शक्यता आहे. नवीन बेदाणा मार्केटमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येईल.

Bedana Market | Agrowon
आणखी पाहा...