Anuradha Vipat
बेदाणे आणि मधाचे पाणी त्वचेला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करून चमक आणण्यासाठी एक अमृत उपाय मानले जाते.
बेदाणे आणि मध या पाण्याचे रोज सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
बेदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि लोह असते. यामुळे त्वचेला आतून नैसर्गिक चमक मिळते.
हे पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून रक्त शुद्ध करते. रक्ताच्या शुद्धीकरणामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स येणे कमी होते.
मधात आणि बेदाण्यांमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होतात.
या पाण्याच्या नियमित सेवनाने चेहऱ्यावरील काळे डाग, पिगमेंटेशन आणि टॅनिंग हळूहळू कमी होते.
मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.