Mahesh Gaikwad
भारत जोडो यात्रेच्या पहिल्या यशस्वी टप्प्यानंतर राहुल गांधींच्या मणिपूर ते महाराष्ट्र भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात झाली आहे.
या यात्रेदरम्यान राहुल गांधी सर्वसामान्यांना भेटून त्यांचे समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
सध्या राहुल यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमधून जात आहे. यावेळी त्यांनी पुर्णियातील सिकंदरपूर गावातील शेतकऱ्यांसोबत 'चौपाल चर्चा' केली.
यावेळी शेतकऱ्यांनी शेतीमधील समस्या राहुल यांच्या समोर मांडल्या. यावेळी राहुल यांनी भूमिअधिग्रणचा मुद्दा लोकसभेत उठवण्याचे आश्वासन दिले.
राहुल यांनी यावेळी शेतकऱ्यांप्रमाणेच डोक्याला मुंडासे बांधले होते.
राहुल यांनी यावेळी शेतकऱ्यांसोबत बटाट्याची भाजी आणि भाकरीचा आस्वाद घेतला. तसेच कुल्हडमध्ये चहा पिण्याचा आनंदही त्यांनी घेतला.
शेतकरी नेते अनिरुध्द मेहता यांनी राहुल यांना मक्याच्या पिकाचे रोप दावून सन्मानित केले.
राहुल गांधी यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्याशी हितगुज साधण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी, महिला आणि तरूणांनी गर्दी केली होती.