Team Agrowon
'नफरत की बाजार मे महोब्बत की दुकान खोल रहा हू' म्हणत कन्याकुमारी ते कश्मिर पायी चालत काँग्रेस नेते यांनी 'भारत जोडो'चा नारा दिला.
सुमारे ३५०० किलोमीटरचे अंतर पायी चालत राहुल गांधी यांनी सामान्य भारतीयांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी सांगता झाल्यानंतरही राहुल गांधी सामान्य भारतीयांच्या समस्या जाणून घेताना अनेकदा दिसले.
प्रामुख्याने असंघटीत क्षेत्रातील कामगार आणि मजुरांच्या समस्या जाणून घेण्याचा सध्या ते प्रयत्न करत आहे.
काही दिवसांपर्वी राहुल गांधींनी दिल्ली ते चंदीगड दरम्यान ट्रकने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी ट्रक चालकांच्या समस्या जाणून घेतल्या.
कर्नाटक विधानसभेच्या प्रचारावेळीही राहुल गांधी यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. कधी फूज डिलिव्हरी बॉईजसोबत स्कूटरवरून प्रवास असो वा त्यांच्यासोबत एकत्रित जेवण करताना राहुल गांधी दिसले.
दिल्लीतील कोरलबाग भागातही त्यांनी अशीच सरप्राईज व्हिजीट दिली. यावेळी या परिसरातील मेकॅनिक लोकांशी संवाद साधाला.
यावेळी राहुल गांधी टू व्हिलर दुरूस्तीचे काम करतानाही पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, आजकाल राहुल यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात ते कधी महाविद्यालयीन तरूणांशी संवाद साधताना दिसतात.