Mahesh Gaikwad
सध्या राहुल गांधी यांची बिहारमध्ये 'व्होटर अधिकार यात्रा' सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल यांनी कटीहार येथील मखाना उत्पादकांची भेट घेतली.
कटीहारमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांनर अस्मानी संकट ओढावले आहे. यामुळे मखाना उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.
संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जात राहुल यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.
यावेळी राहुल यांनी स्वत: मखाना शेतीमध्ये पँट वर चढवून शेतात उतरून नुकसानीची पाहणी केली.
राहुल गांधींनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
याशिवाय राहुल यांनी मखाना लागवडीपासून प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण माहिती घेतली.
जगातील ९० टक्के मखाना उत्पादन बिहारमध्ये होते, पण उत्पादक शेतकऱ्यांना नफ्यातील १ टक्के हिस्सा देखील मिळत नाही, असे राहुल यांनी यावेळी म्हटले.