Anuradha Vipat
आरोग्यासाठी आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाचणी आणि व्हेजिटेबल उत्तप्पा हा एक अतिशय पौष्टिक आणि चवदार नाश्ता आहे.
नाचणी आणि व्हेजिटेबल उत्तप्पा मऊ होतो, त्यामुळे लहान मुले किंवा शाळेच्या टिफिनसाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
नाचणीचे पीठ,रवा ,दही,कांदा,टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची. जिरे, चवीनुसार मीठ, पाणी, शुद्ध तूप किंवा तेल.
बाऊलमध्ये नाचणीचे पीठ, रवा, दही आणि चवीनुसार मीठ एकत्र करा. थोडे-थोडे पाणी घालून मध्यम घट्ट मिश्र तयार करा. हे मिश्रण झाकून १० ते १५ मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या.
पीठ मुरत आहे तोपर्यंत दुसऱ्या एका वाटीत चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर आणि जिरे एकत्र करून मिक्स करा. तवा मध्यम गरम झाल्यावर त्यावर एक मोठे चमचाभर पीठ टाका आणि थोडे जाडसर पसरवा.
पसरवलेल्या पिठावर भाज्यांचे मिश्रण सर्व बाजूने सारखे पसरवा . मंद ते मध्यम आचेवर २-३ मिनिटे झाकण ठेवून वाफ काढा. खालची बाजू चांगली शेकल्यावर उत्तप्पा पलटा आणि दुसरी बाजूही भाज्या हलक्या सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या.
तुमचा गरमागरम आणि मऊ नाचणी व्हेजिटेबल उत्तप्पा तयार आहे! हा उत्तप्पा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.