Anuradha Vipat
आजचा दिवस तुमच्यासाठी मानसिक प्रसन्नता घेऊन येईल . घरगुती खर्च वाढण्याची शक्यता आहे.
कामाच्या ठिकाणी तुम्ही जिद्दीने आणि कठोर परिश्रमाने कार्यरत राहाल. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.
व्यवसायातील जुने आणि महत्त्वाचे प्रश्न आज मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
आज दैनंदिन कामे वेळेत पूर्ण होतील आणि लोकांसोबतचा सुसंवाद वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये मानसिक शांतता मिळेल.
महत्त्वाचे किंवा मोठे निर्णय आज शक्यतो पुढे ढकलावेत . आज तुमचा कल अध्यात्माकडे जास्त राहील.
आज तुम्हाला मित्र आणि कुटुंबातील लोकांचे भरपूर सहकार्य लाभेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
आर्थिक क्षेत्रात किंवा कार्यक्षेत्रात मोठी जोखीम पत्करताना सावधानता बाळगा. आपल्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवा.
आज तुमच्यावर विशेष गुरुकृपा लाभेल .व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात परस्पर सामंजस्य उत्तम राहील.
आज मोठ्या वस्तूंची किंवा खरेदीची शक्यता आहे, ज्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल .
वैवाहिक जीवनात जोडीदाराशी सुसंवाद वाढेल आणि त्यांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल .
आज एकाच वेळी अनेक कामे समोर आल्यामुळे थोडा संभ्रम होऊ शकतो, त्यामुळे शांत मनाने काम करा .
नवीन अधिकार किंवा जबाबदाऱ्या तुमच्या हातात येतील. विवाह इच्छुकांसाठी आज प्रगतीची किंवा पुढील बोलणीची शक्यता आहे.