Anuradha Vipat
दिवाळीच्या सणात साखरेने युक्त आणि मैद्याच्या मिठाईला एक उत्तम, चवदार आणि पौष्टिक पर्याय म्हणजे गूळ आणि नाचणीचे लाडू.
नाचणी ही खनिजे आणि फायबरचा खजिना आहे, तर गूळ शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतो.
हे लाडू खाल्ल्याने वजन वाढण्याची भीती राहत नाही आणि आरोग्यालाही अनेक फायदे होतात.
नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे हे लाडू खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते, भूक नियंत्रणात राहते.
गूळ आणि नाचणी या दोन्हीमध्ये लोहाचे प्रमाण उत्तम असते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
दिवाळीच्या धावपळीत शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठी हा लाडू अत्यंत फायदेशीर आहे.
नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि यात गुळाचा वापर केला जात असल्याने मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास हा लाडू साखरेच्या लाडूंपेक्षा अधिक सुरक्षित मानला जातो.