Deepak Bhandigare
मुळ्यातील डायटरी फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते, यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट स्वच्छ राहते
मुळा हा पोटॅशियमचा चांगला स्रोत असून, तो रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो, पोटॅशियम शरीरातील सोडियमच्या परिणामांना संतुलित ठेवण्यास सहाय्य करते
मुळ्यात 'व्हिटॅमिन सी' असल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते, त्यासाठी आहारात मुळ्याचा समावेश करणे उपयुक्त ठरू शकते
मुळा मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त मानला जातो, त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढत नाही, तरीही मधुमेहींनी याचा आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
मुळ्यात कमी कॅलरीज आणि उच्च फायबर असल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते, फायबरमुळे पोट अधिक वेळ भरलेले राहून अतिखाणे टाळता येते
मुळ्याच्या हिरव्या पानांमध्ये मुळ्यांपेक्षा अधिक पौष्टिक तत्त्वे असतात, त्यात प्रोटीन, डायटरी फायबर असल्याचे एका संशोधनातून आढळून आले आहे
मुळ्यामधील अँटीऑक्सिडंट्स आणि पाण्याचे प्रमाण त्वचेला हायड्रेटेड आणि चमकदार ठेवण्यास मदत करते
सॅलड, भाजी, पराठ्यात मुळ्याचा वापर करुन तुम्ही आहारात त्याचा समावेश करु शकता