Deepak Bhandigare
मेथीची पाने व्हिटॅमिन ए आणि सी, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम यांसारख्या महत्त्वाच्या पोषक तत्त्वांचा चांगला स्रोत आहेत
मेथीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने बद्धकोष्ठता तसेच पचनाशी संबंधित समस्या दूर होते
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी मेथीच्या पानांचे सेवन फायदेशीर मानले जाते, त्यात असलेले अमिनो आम्ल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करु शकते
वजन कमी करण्यासाठी आहारात मेथीच्या भाजीचा समावेश करण्यास सांगितले जाते, हिरव्या मेथीत फायबरचे प्रमाण अधिक तर कॅलरीज कमी असल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते
मेथी त्वचेसाठी फायदेशीर आहे, यामुळे त्वचेवरील डाग, पिंपल्स कमी होऊन त्वचा निरोगी राहते आणि ती उजळते
मेथीमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, मेथीचा आहारात नियमितपणे समावेश केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते
हिरव्या मेथी पालेभाजीत अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहते
मेथीची पाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात आणि यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहू शकते