World Rabies Day: कुत्रा चावल्यास जनावरांना रेबीजचा धोका; संशयित जनावराची अशी घ्या काळजी

Swarali Pawar

रेबीज धोकादायक आजार!

रेबीज हा विषाणूमुळे होणारा गंभीर आणि प्राणघातक आजार आहे. वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केल्यास हा आजार टाळता येतो.

Rabies control measures | Agrowon

चाव्यामुळे होतो संसर्ग

संक्रमित प्राण्याच्या लाळेतून प्रामुख्याने चाव्याद्वारे रेबीजचा प्रसार होतो. कुत्र्यांसोबत मांजर, कोल्हा, लांडगा आणि इतर सस्तन प्राणीही संसर्गाचा स्रोत ठरू शकतात.

Rabies control measures | Agrowon

वर्तन बदलले तर सावध!

जनावर अचानक आक्रमक, अस्वस्थ किंवा असामान्यपणे शांत होऊ शकते. सतत लाळ गळणे, गिळण्यास अडचण आणि चावा घेण्याचा प्रयत्न हीही लक्षणे आहेत.

Rabies control measures | Agrowon

संशयित जनावराला वेगळे ठेवा

रेबीजचा संशय असल्यास जनावराला तातडीने इतर जनावरांपासून वेगळे करा. त्याची लाळ किंवा स्रावांना हाताने स्पर्श करू नका आणि पशुवैद्यकाशी संपर्क साधा.

Rabies control measures | Agrowon

चावा घेतला? लक्षणांची वाट पाहू नका!

कुत्रा किंवा संशयित प्राण्याने चावा घेतल्यास तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. जखमेची स्वच्छता आणि पुढील प्रतिबंधात्मक उपचार पशुवैद्यकीय सल्ल्याने करा.

Rabies control measures | Agrowon

कुत्र्यांचे लसीकरण महत्त्वाचे!

रेबीज नियंत्रणासाठी कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर अँटी-रेबीज लसीकरण महत्त्वाचे आहे. पाळीव आणि भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी स्थानिक यंत्रणेशी समन्वय ठेवा.

Rabies control measures | Agrowon

गोठा आणि परिसर स्वच्छ ठेवा

उघड्या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या आणि मानव-प्राणी संपर्क वाढू शकतो. कचरा व्यवस्थापन आणि परिसराची स्वच्छता राखल्यास धोका कमी करण्यास मदत होते.

Rabies control measures | Agrowon

निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्न!

पशुपालक, पशुवैद्यकीय विभाग, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र काम करणे गरजेचे आहे. लसीकरण, जनजागृती आणि चाव्याच्या घटनांवर त्वरित उपाय केल्यास रेबीज निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल.

Rabies control measures | Agrowon

Oat Fodder: रब्बीत ओटची लागवड! अडीच महिन्यांत मिळेल पौष्टिक हिरवा चारा

Rabies control measures
अधिक माहितीसाठी...