Mahesh Gaikwad
आजकाल अनेक तरूण कामाच्या ताणामुळे सिगारेट ओढताना दिसतात. तर काहींना सतत सिगारेट ओढण्याचे व्यसनचे असते.
जर तुम्हालाही सिगारेटचे व्यसन असेल आणि तुम्हाला या पासून मुक्तता हवी असेल, तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. यामुळे तुमचे सिगारेटचे व्यसन सुटण्यास मदत होईल.
जेव्हा जेव्हा तुम्हाला सिगारेटची तलफ होईल, तेव्हा दालचिनीचा एक तुकडा तोंडात टाकून चघळा. यामुळे निकोटीनची तलफ कमी होण्यास मदत होते.
आल्ल्याच्या रसामध्ये लिंबू आणि एक चिमूटभर काळे मीठ टाका. हे मिश्रण दिवसातीन दोनदा प्यायल्यास सिगारेटची व्यसन हळूहळू कमी होते.
सिगारेटचे व्यसन कमी करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची ४-५ पाने चघळा. यामुळे सिगारेटचे व्यसनही कमी होते आणि तोंडाची दुर्गंधीही येत नाही.
सिगारेटच्या व्यसनापासून सुटका करण्यासाठी जेष्ठमधाची एक काडी तोंडात टाकून चघळत राहा. यामुळे तोंडाला एक चव येते.
जेव्हा जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा होईल, तेव्हा खजूर, काळे मणुके किंवा अक्रोड यासारखा सुकामेवा तोंडात टाका. यामुळे सिगारेटची तलफ कमी होते.
दिवसभरात भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ विशेषत: निकोटीन बाहेर पडण्यास मदत होते. ही माहिती सामान्य माहीतीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.