Anuradha Vipat
मन अशांत वाटणे ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा मन अशांत होते, तेव्हा कोणतेही काम व्यवस्थित होत नाही.
श्वासोच्छवासाचे व्यायाम हा मन शांत करणारा सर्वात सोपा आणि त्वरित परिणाम देणारा उपाय आहे.
दररोज फक्त १० मिनिटे ध्यान केल्याने मनाची चंचलता कमी होते.
नियमित व्यायाम केल्याने शरीरातील तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात आणि आनंदी हार्मोन्स वाढतात.
थोडा वेळ बागेत, झाडांखाली किंवा मोकळ्या जागी घालवा. निसर्गातील शांतता मनाला आराम देते.
मोबाईल फोन, टीव्ही आणि सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहा.
अपुरी झोप हे देखील मन अशांत होण्याचे एक प्रमुख कारण आहे. दररोज ७ ते ८ तास शांत झोप घ्या.