Anuradha Vipat
महाराष्ट्रीयन पनीर रेसिपीमध्ये पनीरला मसालेदार आणि आंबट चवीचे मिश्रण असते. 'पनीर मसाला' आणि 'कोल्हापुरी पनीर' यांसारख्या लोकप्रिय महाराष्ट्रीयन पनीर रेसिपी आहेत
पनीर,कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, जिरे, मोहरी, कढीपत्ता, तेल, कोथिंबीर, मीठ, आवश्यकतेनुसार पाणी.
प्रथम, एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे टाका. नंतर कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या
आले-लसूण पेस्ट घालून चांगले मिक्स करा आणि १-२ मिनिटे परतून घ्या. टोमॅटो आणि सर्व मसाले घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रेव्हीला उकळी येऊ द्या. ग्रेव्ही थोडी घट्ट झाल्यावर पनीरचे तुकडे घालून चांगले मिक्स करा.
मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवून घ्या. गरमागरम कोथिंबीर घालून सजवून भाकरी किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.
पनीर मसाल्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर भाज्या (मटार, शिमला मिरची) देखील वापरू शकता.