Water Crisis : पाणीटंचाईची झळ ; महिलांचे हाल

Team Agrowon

ग्रामीण स्त्रियांचे जीवन जास्त कष्टाचे आहे. घरातील छोटी-छोटी कामे, स्वच्छता, स्वयंपाक, धुणीभांडी, साफसफाई याबरोबर घरातील पाण्याचे व्यवस्थापन करणे ही महिलांची मुख्य कामे आहेत.

Water Crisis | Agrowon

प्रत्येक वर्षी उन्हाळा-दुष्काळ सुरू झाला, की महिलांना आणि लहान बालकांना पाणी मिळविण्यासाठी डोक्यावर हंडे-घागरी, सायकलीला अडकवलेली केंड-घागरी, हातगाड्यावर पाण्याच्या टाक्या, घागरी व इतर मार्गांनी धडपड करावी लागते.

Water Crisis | Agrowon

अलीकडच्या काळात ग्रामीण भागात जमिनीवरील पाणीसाठे आणि भूगर्भातील पाणी यांचा वापराचे नियोजन, व्यवस्थापन आणि काटकसर दिसत नाही. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी दिवसेंदिवस खोलवर जाऊ लागली आहे.

Water Crisis | Agrowon

खोलवर जलपातळी असलेल्या विहिरीतून पाणी शेंदून, उतरून भरणे अतिशय त्रासदायक आणि कष्टप्रद झालेले आहेच. शिवाय हे पाणी भरलेल्या हंडे-घागरी पाणी डोक्यावर किंवा कमरेवर घेऊन शरीराचा तोल सांभाळत महिलांना पायापिट करावी लागते.

Water Crisis | Agrowon

घरातील पिण्याचे आणि वापराचे पाणी भरण्यापासून इतर काही कष्टाची कामे करण्यामुळे महिलांच्या आरोग्याची मोठी हानी होत आहे. मात्र त्याकडे महिला दुर्लक्ष करत असतात.

Water Crisis | Agrowon

डोक्यावर हंडा, घागर, कळशी घेऊन दूरचे अंतर चालत जावे लागते. डोक्यावर पाणी वाहण्यामुळे केस गळणे, पाठीचा कणा दुखणे, झीज होणे, डोके दुखणे, डोक्यासंदर्भातील इतर आजारांचे प्रमाण महिलांमध्ये वाढले आहे.

Water Crisis | Agrowon

कमरेवर पाणी वाहण्यामुळे मणक्याचे, मानेचे, पोटाचे विकार, सांधेदुखी, पायदुखी, गर्भवती महिलांचा गर्भपात होणे इत्यादींच्या महिला बळी ठरत आहेत. तरुणपणी आजार जाणवत नसले तरी वयाच्या पंचेचाळिशीनंतर हळूहळू परिणाम जाणवायला लागतात.

Water Crisis | Agrowon

महिलांच्या आरोग्याकडे कुटुंबातील पुरुषमंडळी अजाणतेपणाने किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून यतात.

Water Crisis | Agrowon

रोजंदारी, कष्टकरी, हातावर काम करून पोट भरणाऱ्या महिलांना दिवसभर काम केल्यावर परत संध्याकाळी-सकाळी पाणी मिळविण्यासाठी वणवण करावी लागते.

Water Crisis | Agrowon

Tax Free Countries : जगातील 'टॅक्स फ्री' देशांबद्दल माहितेय का?