Swarali Pawar
बीज निर्मिती केंद्रांमधून संवर्धन तलावांपर्यंत मत्स्यबीज वाहतूक केली जाते. या प्रवासात ऑक्सिजन, तापमान आणि हालचाल यांची योग्य काळजी घेतली नाही, तर मोठ्या प्रमाणात बीजांचे नुकसान होऊ शकते.
मत्स्यजिरे (Spawn) – ८ मि.मी. पर्यंत, मत्स्यबीज (Fry) – २५ मि.मी. पर्यंत, अर्धबोटुकली – २६ ते ५० मि.मी., बोटुकली (Fingerling) – ५१ मि.मी. पेक्षा जास्त ही वर्गवारी संगोपनासाठी उपयुक्त ठरते.
अयोग्य तापमान, ऑक्सिजनची कमतरता आणि जास्त हालचाल मत्स्यबीजांना ताण देतात आणि मृत्यूदर वाढवतात. वाहतुकीपूर्व तयारी आणि योग्य काळजी घेतल्यास ९०–९५% बीज जिवंत राहते.
चांगल्या बीजात जलद वाढीची क्षमता, खाद्य ग्रहणाची सवय, रोगप्रतिकारक शक्ती आणि वातावरणाशी जुळवून घेण्याची ताकद असते. अशा बीजांमुळे उत्पादन व नफा दोन्ही वाढतात.
भारतामध्ये सरकारी व खाजगी संस्था बीज उत्पादन करतात. अनेक शेतकरी स्वतःच बीज तयार करतात, मात्र योग्य तांत्रिक मार्गदर्शनाशिवाय गुणवत्तेत घसरण होते.
जनुकीय आंतरप्रजननामुळे बीजाचा दर्जा कमी होऊ शकतो. त्यामुळे प्रजनन व्यवस्थापन आणि निवड प्रक्रिया योग्य असणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण पालक माशांचा साठा राखणे अत्यावश्यक आहे.
CIFRI संस्थेने विकसित केलेला जयंती रोहू. हा सुधारित मत्स्यप्रकार अधिक उत्पादनक्षम आणि लोकप्रिय आहे. तो मत्स्य संवर्धनातील जनुकीय सुधारणा यशाचे प्रतीक ठरला आहे.
गुणवत्तापूर्ण, निरोगी आणि योग्यरीत्या वाहतूक केलेले बीज हेच यशस्वी मत्स्यपालनाचे गमक आहे.