Swarali Pawar
एकदाच सगळी फळं तोडू नका. ती तीन-चार टप्प्यांत काढल्यास बाजारात आवक कमी राहते
आणि भाव चांगले मिळतात आणि नुकसान टळते.
काढणीपूर्वी फळांना जिब्रेलिक ॲसिड (10 ppm) आणि कार्बेन्डाझिम फवारणी केल्यास फळं सडत नाहीत. ही प्रक्रिया दर्जा आणि टिकाऊपणा राखते.
आंबिया बहरातील फळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तयार होतात, तर मृग बहरातील जानेवारी-फेब्रुवारीत. फळांचा रंग फिकट नारिंगी आणि साल थोडी सैल दिसली की ती काढणीस तयार.
शर्करा ८-१४% आणि आम्ल ०.५-०.८% असावे. शर्करा-आम्ल गुणोत्तर १५ ते १८ असेल तर फळे गोड आणि दर्जेदार. हे मोजण्यासाठी ‘रिफ्रॅक्टोमीटर’चा वापर करा.
फळ पिळून किंवा ओढून तोडू नका. क्लीपरने देठासह कापावे आणि साधारण २ मिमी देठ ठेवावा. यामुळे बुरशीचा प्रसार होत नाही आणि फळ सुरक्षित राहते.
फळे जमिनीवर न ठेवता हवेशीर प्लास्टिक क्रेट्समध्ये भरा. सावलीत ठेवा, ढिग करून साठवू नका. यामुळे फळांचे सुकणे व दाबामुळे होणारे नुकसान टळते.
गवतावर फळांचा ढीग करून वाहतूक करणे चुकीचे! अशा पद्धतीने १५ ते २० टक्के नुकसान होते. प्लास्टिक क्रेट्स वापरल्यास फळांचा दर्जा टिकतो आणि निर्यातीस योग्य ठरतात.
तोडणीपासून वाहतुकीपर्यंत प्रत्येक टप्प्यात काळजी घ्या. फळांचा दर्जा टिकवला तर बाजारभावही उत्तम मिळतो. गुणवत्ता जपा, नफा वाढवा हीच यशाची गुरुकिल्ली!