Kadhi Pakora Recipe : एका क्लिकवर जाणून घ्या 'कढी-पकोडा' बनवण्याची रेसिपी

Anuradha Vipat

'कढी-पकोडा' 

गरमागरम, चटपटीत आणि पचायला हलका असा 'कढी-पकोडा' भातासोबत खायला अतिशय चविष्ट लागतो.

Kadhi Pakora Recipe | agrowon

पकोड्यासाठी साहित्य

 १ वाटी बेसन, १ मध्यम चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा, चिमूटभर खाण्याचा सोडा, मीठ आणि तेल. 

Kadhi Pakora Recipe | Agrowon

पकोड्यासाठी कृती

बेसनात कांदा, मिरची, कोथिंबीर, ओवा आणि मीठ घालून थोडे पाणी टाकून घट्टसर पीठ भिजवा. शेवटी सोडा घालून मिक्स करा. गरम तेलात छोटे छोटे पकोडे तळून बाजूला ठेवा. 

Kadhi Pakora Recipe | Agrowon

कढीसाठी साहित्य

२ वाट्या दही किंवा ताक, ३ मोठे चमचे बेसन, हळद, आल्याची पेस्ट, मीठ आणि साखर.

Kadhi Pakora Recipe | agrowon

कढीसाठी कृती

दही आणि बेसन एकत्र फेटून घ्या. त्यात ३-४ वाट्या पाणी, हळद, मीठ आणि थोडी साखर घालून पातळ मिश्रण तयार करा

Kadhi Pakora Recipe | agrowon

मिश्रण

कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे, मेथी दाणे, हिंग, कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची घालून फोडणी करा. तयार केलेले दह्याचे मिश्रण कढईत ओता.

Kadhi Pakora Recipe | Kadhi Pakora Recipe

शिजवणे

कढी ५-७ मिनिटे शिजल्यावर त्यात तयार केलेले पकोडे सोडा. पकोडे घातल्यावर २ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. वरून कोथिंबीर घाला. तुमचा स्वादिष्ट कढी-पकोडा तयार आहे

Kadhi Pakora Recipe | agrowon

Eating Khari With Tea : तुम्हालाही आहे का चहासोबत खारी खायची सवय? मग एकदा परिणाम वाचा

Eating Khari With Tea | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...