Anuradha Vipat
पिंपरी चिंचवडमधील वसाहतींमध्ये अतिमुसळधार पावसामुळे पाण्याचा शिरकाव झाला आहे
अतिमुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवडच्या अनेक भागांतील दोन हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे.
पिंपरी चिंचवडमधील संजय गांधी नगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, जाधव घाट, किवळे या ठिकाणी पाण्याचा शिरकाव झाला आहे.
अतिमुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवडमधील अनेकांच्या घरात पाणी साचलेलं आहे.
पावसाचा जोर अजही आणखी वाढला तर परिस्थिती आणखी बदलणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महात्मा ज्योतीबा फुले या शाळेत नागरिकांच्या राहण्याची सोय केली आहे.