World Pulses Day : जमीन अन् मानवाच्या पोषणासाठी कडधान्ये महत्त्वाची

Mahesh Gaikwad

जागतिक कडधान्य दिन

दरवर्षी जगभरात १० फेब्रूवारी हा दिवस 'जागतिक कडधान्य दिन' म्हणून साजरा केला जातो.

World Pulses Day | Agrowon

मानवी पोषण

'जमीन आणि मानवाच्या पोषणासाठी कडधान्ये' हे यंदाच्या कडधान्य दिनाचे घोषवाक्य आहे.

World Pulses Day | Agrowon

शाश्वत शेती

मानवी आरोग्यासाठी कडधान्ये ही जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहेत. याशिवाय मानवी पोषणासह शाश्वत शेतीसाठी कडधान्ये अतिशय महत्त्वाची आहेत.

World Pulses Day | Agrowon

आहारात कडधान्ये

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संशोधनानुसार प्रतिवर्षी प्रति व्यक्ती कमीत कमी १७ ते २५ किलो कडधान्यांचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे.

World Pulses Day | Agrowon

पचायला सोपी

मोड आलेली कडधान्ये पचायला सोपी असतात. त्यामध्ये जीवनसत्त्वांचे प्रमाणही वाढते. 'क' जीवनसत्त्व मोड आल्यावर तयार होते.

World Pulses Day | Agrowon

प्रथिनांचा स्त्रोत

मानवी आहारात कडधान्ये हे वनस्पती आधारित प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते.

World Pulses Day | Agrowon

रक्तातील साखर

डाळींमध्ये तंतुमय घटकांचे प्रमाण अधिक असते, जे पचनास मदत करते. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

World Pulses Day | Agrowon

अन्नसुरक्षा

अन्नसुरक्षेसाठी कडधान्य पिके महत्त्वाची आहेत. कडधान्ये ही सर्व आर्थिक स्तरातील लोकांना परवडणारी आहे. त्यामुळे लोकांची अन्नाची गरज भागविण्यात कडधान्यांचा प्रमुख वाटा आहे.

World Pulses Day | Agrowon