Swarali Pawar
वय, वजन व दूध उत्पादनानुसार दिलेला आहार म्हणजे संतुलित आहार. अशा आहारामुळे दूध उत्पादन 15–25 टक्क्यांनी वाढू शकते.
कडधान्ये प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत. प्रथिने दूध उत्पादन आणि शरीर वाढीसाठी गरजेची असतात.
हरभरा, तूर, मूग, उडीद व सोयाबीन उपयुक्त आहेत. विशेषतः सोयाबीन पेंड पशुआहारात फायदेशीर ठरते.
दूध उत्पादन वाढते आणि जनावरे निरोगी राहतात. वासरांची वाढ आणि प्रतिकारशक्ती सुधारते.
नवीन कडधान्य एकदम जास्त देऊ नये. 200–300 ग्रॅमपासून सुरू करून हळूहळू वाढवा.
कडधान्ये पूर्ण न देता भरड करून द्यावीत. यामुळे पचन चांगले होते आणि अपचन टळते.
रिकाम्या पोटी पशुआहार देऊ नये. आधी हिरवा किंवा कोरडा चारा द्यावा.
साधारण 2.5 लिटर दुधामागे 1 किलो पशुआहार द्यावा. योग्य प्रमाण ठेवल्यास नुकसान टाळता येते.