Azolla Fodder: उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचे टेन्शन मिटले, घरीच बनवा अझोला चारा

Swarali Pawar

अझोला म्हणजे काय?

अझोला ही पाण्यावर वाढणारी शेवाळासारखी वनस्पती आहे. ती प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असते.

What is azolla | Agrowon

उन्हाळ्यासाठी बेस्ट

अझोलासाठी अर्धा सूर्यप्रकाश आणि २०–२८°C तापमान योग्य असते. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा मोठा आधार अझोला ठरतो.

Best option for Summers | Agrowon

अझोलाचे फायदे

कमी खर्चात, कमी जागेत अझोला लवकर तयार होतो. गाई-म्हशींसाठी उत्तम पूरक हिरवा चारा मिळतो.

Benefits of Azolla | Agrowon

कुठे आणि कसा तयार करावा?

घराशेजारी छोट्या हौदात किंवा अंगणात अझोला तयार करता येतो. २×२ मीटर प्लास्टिक शीटवर आधारित बेड पुरेसा असतो.

How and Where to Make | Agrowon

हौद तयार करण्याची पद्धत

प्लास्टिक शीटवर माती, शेण-सुपर फॉस्फेट स्लरी व पाणी टाकावे. शेवटी शुद्ध अझोला कल्चर पसरवावे.

Making of Bed | Agrowon

देखभाल कशी करावी?

दर ५ दिवसांनी शेण व सुपर फॉस्फेट द्यावे. आठवड्यातून एकदा सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळावीत.

Care of Azolla Bed | Agrowon

अझोलाची काढणी

१०-१५ दिवसांत बेड भरतो आणि काढणी सुरू होते. दररोज ५००-६०० ग्रॅम अझोला मिळतो.

Azolla Harvesting | Agrowon

जनावरांना कसे द्यावे?

काढलेला अझोला स्वच्छ पाण्याने धुवून खाऊ घालावा. यामुळे वास कमी होतो आणि चव चांगली लागते.

How to Feed Animals | Agrowon

ShadeNet House: शेडनेट उभारताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या?

Agrowon
अधिक माहितीसाठी...