Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये देवघर योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
देवघरासाठी घराचा ईशान्य कोपरा म्हणजेच ईश्वराची दिशा सर्वोत्तम मानली जाते
पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. त्यानुसार देवांच्या मूर्तींची मांडणी करावी
देवघर कधीही शौचालयाला लागून किंवा खाली-वर नसावे. स्वयंपाकघरात देवघर असल्यास ते गॅस ओट्याच्या वर नसावे.
बेडरूममध्ये देवघर ठेवणे टाळावे जागा नसल्यास रात्री देवघराला पडदा लावावा.
देवघरात खूप मोठ्या मूर्ती नसाव्यात. मूर्तींची उंची शक्यतो २ ते ६ इंचांच्या दरम्यान असावी.
दिवा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला लावावा. देवघरात नेहमी स्वच्छता ठेवावी.