Anuradha Vipat
शकुन शास्त्रानुसार पुरुषांच्या बाबतीत काही शरीरिक हालचाली आणि घटनांना शुभ-अशुभ मानले जाते.
पुरुषांसाठी उजवा डोळा लवणे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ लवकरच धनलाभ होणार आहे.
जर पुरुषाच्या उजव्या हाताच्या तळव्याला खाज येत असेल, तर ते धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते.
प्रवासाला निघताना कावळा उजव्या बाजूने उडाला तर तो प्रवास सुखकर आणि लाभदायी ठरतो.
पुरुषांसाठी डावा डोळा लवणे अशुभ मानले जाते. हे भविष्यातील संकटाचे संकेत असू शकतात.
डाव्या हाताला खाज येणे म्हणजे विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता असते.
घराबाहेर पडताना किंवा घरात महत्त्वाचे काम करताना काच फुटणे हे कामात अडथळे येण्याचे लक्षण मानले जाते