Tur Crop Management : भरघोस उत्पादनासाठी अशी करा तुरीची छाटणी

Team Agrowon

तूर पिकाच्या झाडांची उंची वाढविण्याऐवजी फांद्याची संख्या वाढणे उत्पादकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. तूर झाडाच्या मुख्य खोडावर मुख्य फांद्या, मुख्य फांद्यावर उपमुख्य फांद्या, उपमुख्य फांद्यावर उपफांद्या म्हणजेच तोरंबे येतात.

Tur Crop Management | Agrowon

उत्पादकता वाढीसाठी तोरंब्याची संख्या आणि लांबी जेवढी जास्त तेवढे चांगले. पीक साधारणतः एक महिन्याचे असताना मुख्य खोडावर मुख्य फांद्या येण्यास सुरुवात होते, तर दोन महिन्यांचे होताना उपमुख्य फांद्या फुटू लागतात.

Tur Crop Management | Agrowon

साधारणतः तीन महिन्यांचे पीक होताना उपफांद्या येऊ लागतात. उपफांद्याची संख्या वाढण्यासाठी पीक २५ ते ३० दिवसांचे असताना शेंडे छाटून घ्यावेत.

Tur Crop Management | Agrowon

अलीकडे शेंडे छाटण्याची सुरक्षित अशी छोटी यंत्रे मिळतात. या वेळी प्रत्येक झाडाच्या शेंड्यावरील केवळ कोवळा पर्णगुच्छ मशीनद्वारे छाटावा.

Tur Crop Management | Agrowon

पीक ५५ ते ६० दिवसांचे असताना आणि पुढे ८० ते ९० दिवसांचे असतानाही कोवळे शेंडे छाटून घ्यावेत. शेंडे छाटणीवेळी जमिनीत मुबलक ओल असावी.

Tur Crop Management | Agrowon

पावसाळी वातावरण असल्यास छाटणी केल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी अवश्य करावी. या वेळी तज्ज्ञांच्या सल्ल्याने वाढरोधकाचाही वापर करता येईल. मजूर व अन्य काही कारणामुळे केवळ दोन वेळाच छाटणी शक्य असल्यास पेरणीपासून ३५ दिवसांनी व ७० दिवसांनी करावी.

Tur Crop Management | Agrowon

केवळ एक वेळा छाटणी शक्य असल्यास पीक साधारणतः ६० ते ७० दिवसांचे असताना करावी. तुरीचे पीक सरसकट सतरा पानांवर असताना मशिनद्वारे छाटणी केल्यास प्रत्येक झाडावर सुमारे सतरा फुटवे येत असल्याचा प्रगतिशील शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

Tur Crop Management | Agrowon
आणखी पाहा...