Moringa Prunning : भरपूर शेंगा येण्यासाठी अशी करा शेवग्याची छाटणी

Team Agrowon

शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असल्यामुळे झाडांना आकार देणे आवश्यक आहे.

Moringa Prunning | Agrowon

व्यवस्थित आकार न दिल्यास झाड उंच वाढते. त्यामुळे शेंगा काढणे अवघड होऊन जाते.

Moringa Prunning | Agrowon

लागवडीनंतर २ ते अडीच महिने किंवा मुख्य खोड ३ ते ४ फूट झाल्यानंतर पहिली छाटणी करावी.

Moringa Prunning | Agrowon

खोड जमिनीपासून १ मीटर अंतरावर छाटावे. चार दिशांना चार फांद्या वाढू द्याव्यात. यामुळे झाडांची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाते.

Moringa Prunning | Agrowon

त्यानंतर ३ ते ४ महिन्यांनी चारही फांद्या मुख्यः खोडापासून एक मीटर अंतरावर छाटाव्यात. त्यामुळे झाडाचा मुख्यः आराखडा तयार होण्यास मदत होते.

Moringa Prunning | Agrowon

झाडाची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे होते.

Moringa Prunning | Agrowon

पुढे दर दोन वर्षांनी एप्रिल-मे महिन्यात शेंगा निघाल्यावर छाटणी करावी. म्हणजे झाड नियमित उत्पादन देईल.

Moringa Prunning | Agrowon