Anuradha Vipat
शरीरात प्रथिनांची कमतरता असल्यास शरीर काही संकेत देऊ लागते. या महत्त्वाच्या ७ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास सारखी भूक लागते आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढते.
शरीराला पुरेसे प्रोटीन मिळाले नाही तर शरीर स्नायूंमधून प्रोटीन खेचू लागते ज्यामुळे अशक्तपणा जाणवतो.
केस गळणे, नखे ठिसूळ होणे आणि त्वचेचा रंग फिका पडणे किंवा त्वचा कोरडी होणे ही प्रोटीनच्या कमतरतेची प्रमुख लक्षणे आहेत.
प्रोटीनच्या कमतरतेमुळे तुम्ही सर्दी, खोकला किंवा संसर्गाला लवकर बळी पडता.
दिवसभर काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा कमी पडते आणि शरीरात प्रचंड सुस्ती किंवा थकवा जाणवतो.
रक्तातील प्रोटीनच्या कमतरतेमुळे हाता-पायांना किंवा पोटाला सूज येऊ शकते.