Swarali Pawar
क्रॉप कव्हर हे पिकांवर टाकले जाणारे हलके आच्छादन असते. ते ऊन, कीड आणि हवामान बदलांपासून पिकांचे संरक्षण करते.
४० अंशांपेक्षा जास्त तापमानात पिकांना सनबर्न होतो. क्रॉप कव्हर ही झळ कमी करून झाडे सुरक्षित ठेवते.
मावा, पांढरी माशी आणि फुलकिडे कमी प्रमाणात येतात. त्यामुळे कीटकनाशकांचा खर्च कमी होतो.
जमिनीतून पाणी लवकर वाफ होत नाही. सिंचनाची गरज कमी होते आणि ओलावा टिकतो.
फळे चकचकीत, आकाराने चांगली आणि रंगाने आकर्षक होतात. बाजारात चांगला दर मिळतो.
द्राक्ष, डाळिंब, केळी, ढोबळी मिरची आणि भाजीपाला पिकांसाठी उपयोगी. फुलशेतीतही याचा चांगला फायदा होतो.
फॅब्रिक कव्हर आणि प्लास्टिक कव्हर हे दोन मुख्य प्रकार आहेत. उन्हाळ्यात फॅब्रिक कव्हर जास्त वापरले जाते.
क्रॉप कव्हरची सुरुवातीची गुंतवणूक फायदेशीर ठरते. उत्पादन वाढवण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी याचा वापर करा.