Swarali Pawar
मध्यम ते भारी आणि चांगला निचरा असलेली जमीन तिळासाठी उत्तम असते. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ दरम्यान असावा.
उगवणीसाठी १५°C आणि वाढीसाठी २५–३०°C तापमान योग्य असते. ४०°C पेक्षा जास्त तापमानात फुलगळ होते.
जमीन भुसभुशीत पण वरून थोडी टणक ठेवावी. एक-दोन कुळवाच्या पाळ्या देऊन शेणखत मिसळावे.
१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान पेरणी करावी. उशीर झाल्यास पीक पावसात सापडू शकते.
हेक्टरी २.५ ते ३ किलो बियाणे वापरावे. ओळीतील अंतर ३० किंवा ४५ सें.मी. ठेवावे.
८–१० दिवसांनी पहिली विरळणी करावी. सुरुवातीच्या ३० दिवसांत पीक तणमुक्त ठेवा.
शेणखत ५ टन प्रति हेक्टर द्यावे. नत्र व स्फुरद योग्य प्रमाणात द्यावे.
१२–१५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुलोरा व बोंडे भरताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.