Snake Bite : पावसाळ्यात सर्पदंशापासून असा करा बचाव

Team Agrowon

सर्पदंशाचे बहुतांश रुग्ण गरीब तरुण, शेतमजूर

भारतामध्ये दर वर्षी २७ लाख लोकांना सर्पदंश होतो. ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. सर्पदंशाचे बहुतांश रुग्ण गरीब तरुण शेतमजूर, महिला व मुले असतात.

Snake Bite | Agrowon

जनजागृती

पावसाळ्यात सर्पदंशाबाबत गाव व वाड्या वस्त्यांवर जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे आहे.

Snake Bite | Agrowon

योग्य उपाय आणि सावधगिरी बाळगणे

योग्य उपाय आणि सावधगिरी बाळगल्यास सर्पदंश व त्यामुळे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात.

Snake Bite | Agrowon

गम बूट चा वापर

‘पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतात काम करताना शक्यतो पायवाट सोडून जाऊ नये. गवतातून चालताना पायात बूट घालावेत.

Snake Bite | Agrowon

शेतात काम करताना

उंच गवतात वावर असणाऱ्या व्यक्तींनी नडगी व पोटरी यांचे संरक्षण करू शकतील अशी आवरणे बांधणे आवश्यक आहे.

Snake Bite | Agrowon

जमिनीवर झोपणे टाळावे

घरात जमिनीवर झोपणे टाळावे. झोपेच्या आधी अंथरूण तपासावे.

Snake Bite | Agrowon

प्राथमिक उपचार महत्वाचे

सर्पदंश झाल्यानंतर ताबडतोब रुग्णाला प्राथमिक उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात नेले पाहिजे. याबाबत जनजागृती हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे.

Snake Bite | Agrowon