Mahesh Gaikwad
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डासांची संख्या वेगाने वाढते. स्वच्छ साठलेल्या पाण्यामुळे डेंग्यूसारखे जीवघेणे डासही होतात.
डेंग्यूच्या डासामुळे येणारा ताप सामान्य वाटत असला. तरी यामुळे जीवाचा धोका असतो. परंतु घरात काही विशिष्ट फुलांची आणि औषधी झाडे लावून तुम्ही डासांना पळवून लावू शकता.
झेंडूचे फूल डासांना दूर ठेवण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. झेंडूच्या फुलाचा रंग आणि सुगंध आकर्षित करतो. पण याच्या वासामुळे डास मात्र पळून जातात.
झेंडूच्या फुलातून येणाऱ्या सुगंधामध्ये पाइरॅथ्रेम, सॅपोनिन, स्कोपोलेटिन, कॅडिनॉल असे तत्त्व असतात, जे डासांना दूर ठेवतात.
डासांपासून बचावासाठी तुम्ही रोझमेरीचे झाडही घरात लावू शकता. रोझमेरी ही एक सुगंधी वनस्पती आहे. याचे पाने पातळ आणि टोकदार असतात.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फुलणाऱ्या झाडाच्या देठाचा सुगंधामुळे डास आणि अन्य किटक दूर राहतात.
याशिवाय घरामध्ये तुळस, गवतीचहा आणि लॅव्हेंडर या सारख्या वनस्पतीही तुम्ही घरात लावू शकता. यामुळे घरात डास येत नाहीत.
तुळस ही औषधी वनस्पती आहे. तुळशीच्या पानांच्या वासामुळे डेंग्यूसारखे डासही पळून जातात. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.