Mahesh Gaikwad
धावपळीच्या आयुष्यामध्ये धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचा निस्तेज होते. यासाठी त्वचेची योग्य निगा राखणे आवश्यक आहे.
सकाळी उठल्यावर चेहऱ्याला नैसर्गिक चमक आणि फ्रेश लुक मिळण्यासाठी कोरफड हा उत्तम पर्याय आहे.
कोरफडीमध्ये व्हिटामिन-ए, सी आणि ई असते, जे त्वचेला मॉइश्चुराईज करते. सकाळी चेहऱ्याला कोरफड लावल्यास त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होते.
चेहऱ्याला कोरफड जेल लावल्यामुळे दिवसभर त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि नैसर्गिक चमक येते.
चेहऱ्याला कोरफडीचा गर लावण्यापूर्वी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून साफ करा.
चेहरा धुतल्यानंतर हलक्या हाताने कोरफडीचा गर किंवा जेल लावून मालिश करा. यामुळे त्वचेवरील घाण व अतिरिक्त तेल काढून टाकले जाते.
कोरफडीच्या जेलने चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे डार्क सर्कल आणि सुरकुतत्या कमी होतात.
कोरफड ही नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. यामुळे त्वचा मऊ व टवटवीत राहते आणि चेहऱ्यावर चिकटपणा राहत नाही.