Roshan Talape
शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीवर ५० टक्के अनुदान सरकार देणार आहे.
पिकांचे नुकसान थांबवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत अर्धे पैसे शेतकरी भरतील, तर उरलेले पैसे सरकार लाभार्थ्याच्या खात्यात टाकेल.
ताडपत्रीचा उपयोग तात्पुरते शेड, स्टॉल किंवा घरगुती कामासाठीही होईल.
लहान शेतकरी, महिला, दिव्यांग, SC/ST शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य असेल.
लाभार्थ्यांकडे शेतजमीन असावी, आधार बँक खात्याशी जोडलेले असावे, तसेच लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
आधार कार्ड, पासबुक, जमीन दाखला, जात दाखला (असल्यास), आणि ताडपत्रीचे पक्के बिल असावे.
महाडीबीटी संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी कार्यालयात अर्ज करा.