Roshan Talape
शेतातील किंवा घराजवळील जमिनीच्या सीमारेषांवरून अनेकदा वाद होतात. योग्य कायदेशीर माहितीने हे प्रश्न सोडवता येतात.
७/१२ उतारा, फेरफार उतारा आणि महाभूमी पोर्टलवरील नकाशा तपासून शेजाऱ्याने तुमच्या जमिनीत अतिक्रमण केले आहे का ते सहज ओळखता येते.
गाव नकाशा आणि खातेदारी नोंदी तपासून घ्या. या नोंदींमध्ये तुमच्या जमिनीची खरी हद्द स्पष्टपणे नमूद असते, त्यामुळे शेजाऱ्याशी होणारे वाद टाळता येतात.
तलाठी कार्यालयात अर्ज करून सर्व्हेअरकडून जमिनीची मोजणी करून घ्या. मिळालेला मोजणी अहवाल हा तुमच्या दाव्यासाठी ठोस पुरावा ठरतो.
तुमच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेतला असेल तर प्रथम तहसीलदार कार्यालयात तक्रार नोंदवा. जर महसूल विभागातून तोडगा न निघाल्यास, सिव्हिल कोर्टात दावा दाखल करा.
जमीन हक्काच्या दाव्यासाठी ७/१२ उतारा, ८-अ उतारा, फेरफार दाखले, गाव नकाशा आणि मोजणी अहवाल ही आवश्यक व महत्त्वाची कागदपत्रं आहेत.
मीन हक्काचा दावा दाखल करताना अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या. खोटा पुरावा सादर करू नका आणि कोर्टाचा निर्णय येईपर्यंत संयम बाळगा.
जमिनीवर कायमस्वरूपी हक्क टिकवण्यासाठी वेळेवर कर भरा, सर्व नोंदी अद्ययावत ठेवा आणि शेजाऱ्याशी थेट वाद टाळण्याचा प्रयत्न करा.