Soybean Management: सोयाबीनमध्ये कीड-रोगांचा वाढता धोका; वेळेत करा हे उपाय

Swarali Pawar

कीड रोगांचा धोका

दमट हवामान आणि पावसाच्या खंडामुळे सोयाबीनमध्ये कीड-रोगांचा धोका वाढतो. वेळीच उपाय केल्यास उत्पादनातील नुकसान टाळता येते.

Disease Pest free Soybean | Agrowon

कोणत्या किडी-रोगांचा धोका?

पांढरी माशी, स्पोडोप्टेरा, पाने खाणाऱ्या अळ्या आणि मुळकुज-खोडकुज वाढू शकते. त्यामुळे पिकाची नियमित पाहणी करणे खूप महत्त्वाचे आहे.

Disease Pest free Soybean | Agrowon

पिवळे चिकट सापळे लावा

पेरणीनंतर दोन आठवड्यांत एकरी २० पिवळे चिकट सापळे लावा. यासोबत ३ कामगंध सापळे आणि २० पक्षीथांबे उभारा.

Disease Pest free Soybean | Agrowon

पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

पावसाचा खंड पडल्यास शक्य असल्यास संरक्षित सिंचन द्या. अतिवृष्टी झाल्यास शेतातील साचलेले पाणी त्वरित बाहेर काढा.

Disease Pest free Soybean | Agrowon

मुळकुज-खोडकुज रोखा

रोगाची लक्षणे दिसताच ट्रायकोडर्माचा वापर करा. यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रसार कमी करण्यास मदत होते.

Disease Pest free Soybean | Agrowon

अळी नियंत्रणासाठी काय कराल?

स्पोडोप्टेरा किंवा पाने खाणाऱ्या अळ्या दिसताच फवारणी करा. शिफारशीनुसार फ्लूबेंडामाईड किंवा क्लोरपायरीफॉस वापरा.

Disease Pest free Soybean | Agrowon

शेंगांवरील करपा टाळा

पेरणीनंतर ६० ते ६५ आणि ७५ ते ८० दिवसांनी बुरशीनाशकाची फवारणी करा. यामुळे शेंगांवरील करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.

Disease Pest free Soybean | Agrowon

नियमित निरीक्षण म्हणजेच संरक्षण

आठवड्यातून एकदा पिकाची पाहणी करा आणि लक्षणे दिसताच उपाय करा. वेळीच व्यवस्थापन केल्यास सोयाबीनचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही टिकून राहतात.

Disease Pest free Soybean | Agrowon

Monsoon Poultry Management: पावसाळ्यात कोंबड्यांची अशी घ्या काळजी! आजार टाळून उत्पादन वाढवा

Agrowon
अधिक माहितीसाठी