Swarali Pawar
ओलसर वातावरणामुळे कोंबड्यांमध्ये विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. वेळीच योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनातील नुकसान टाळता येते.
गढूळ किंवा शेवाळयुक्त पाण्यामुळे कॉक्सिडिओसिससारख्या आजारांचा धोका वाढतो. कोंबड्यांना नेहमी स्वच्छ आणि निर्जंतुक पाणीच पाजावे.
शेडमध्ये पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. योग्य निचरा आणि खेळती हवा ठेवल्यास आजारांचे प्रमाण कमी होते.
तूस दिवसातून किमान एकदा हलवून सैल करा. ओलसर लिटर त्वरित काढून त्याऐवजी नवीन तूस टाका.
एका आठवड्यापुरतेच खाद्य साठवून ठेवा. बुरशी आलेले किंवा गाठी पडलेले खाद्य कोंबड्यांना देऊ नका.
ओलसर गादीमुळे माशा आणि अमोनियाचे प्रमाण वाढते. यामुळे डोळे, श्वसन आणि त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते.
पाण्यात शिफारशीनुसार क्लोरीन किंवा ब्लीचिंग पावडर वापरा. पाण्याच्या टाकीवर नेहमी झाकण ठेवून ती स्वच्छ ठेवा.
स्वच्छ शेड, कोरडे लिटर, सुरक्षित पाणी आणि दर्जेदार खाद्य यावर भर द्या. यामुळे कोंबड्या निरोगी राहून अंडी आणि मांस उत्पादन चांगले मिळते.