Aslam Abdul Shanedivan
गेल्या वर्षी (२०२३) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाला. यामुळे दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे.
कमी पाऊस आणि त्यानंतर अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसल्याने खरीप हंगामातील पिके उधवस्त झाली तर रब्बीची पेरणी लांबिवली.
त्यातच आता धरणातील पाणी साठा ही कमी होत असल्याचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे
दरम्यान दुष्काळाच्या सावटामुळे जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे.
अत्यल्प पाऊस, खरीप हंगामासह रब्बीतील पिकांना बसलेला फटक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय समितीकडून राज्याचा दौरा करण्यात आला होता.
या समितीचा अहवाल आला असून राज्यात दुष्काळी परिस्थिती भयंकर असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील ४० तालूक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे.
पण केंद्र सरकारकडून दुष्काळी अनुदान अद्यापही मिळालेलं नाही. तर यासाठी शेतकऱ्यांना थांबावे लागणार आहे. कारण मार्च २०२४ मध्ये लोकसभेची आचारसंहीता लागेल.